ए.पी.जे.
अब्दुल कलाम
ए.पी.जे. अब्दुल
कलाम
|
|
पूर्ण नाव
|
अब्दुल
पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
|
जन्म
|
|
मृत्यू
|
|
नागरिकत्व
|
|
राष्ट्रीयत्व
|
|
धर्म
|
|
कार्यसंस्था
|
संरक्षण
संशोधन आणि विकास संस्था
|
प्रशिक्षण
|
मद्रास
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
|
ख्याती
|
भारताचे
माजी राष्ट्रपति
|
पुरस्कार
|
|
वडील
|
जैनुलाबदिन
अब्दुल
|
डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल
कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल हे भारताचे अकरावे राष्ट्रपती
(कार्यकाळ २५ जुलै,
इ.स. २००२
ते २५ जुलै,
इ.स. २००७[१]) होते. आपल्या
आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून
लोकप्रिय झाले.
शिक्षण
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून
धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले
शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र
गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत.
त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट
जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी.
झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत
प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते.
बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून
एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी
अमेरिकेतील 'नासा'
या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास
संस्थेशी (DRDO) संबंध आला.
कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील
पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने
क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये
आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत
(इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३
या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात
विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे
कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश
केंद्रा'चे ते प्रमुख
झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग
करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या
यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे
वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण
मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ
चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक
No comments:
Post a Comment